बऱ्याच जणांना असा गैरसमज आहे की 3D प्रिंटींग म्हणजे फोटो प्रिंट करणे किंवा कोणत्याही वस्तूवर चित्र प्रिंट करणे किंवा वृत्तपत्र किंवा कपड्यावर डिझाईन प्रिंट करणे इत्यादी इत्यादी. पण हे असे नाही आहे. 3D प्रिंटींग द्वारे आपण हवी असलेली कोणती वस्तू बनवू शकतो. खालील काही वस्तू 3D प्रिंटींगने बनवलेल्या आहेत.
3D प्रिंटींग म्हणजे काय त्याची प्रक्रिया व त्याद्वारे काय काय बनवू शकतो हे जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण वाचा.
मी रविंद्र गावडे Next Gen 3D Guide, founder of "Mission 3D for Generation Next" आणि माझं Mission आहे की येत्या तीन वर्षांमध्ये कमीत कमी १०,०००विद्यार्थ्यांना 3D Printing बद्दल aware करायचे आणि त्याच्या मदतीने ते भविष्यासाठी स्वतःला तयार करू शकतील.
चला तर मग जाणून घेऊया थ्रीडी प्रिंटिंग प्रक्रियाच्या 6 पायऱ्या
प्रथम आपल्याला जो पार्ट बनवायचा असेल त्याचे 3D CAD Model अगदी पूर्ण मापा सकट बनवायचे आहे. हे 3D CAD Model तीन प्रकारच्या सॉफ्टवेअरने तुम्ही बनवू शकता. पहिला सॉफ्टवेअर आहे Google Sketchup दुसरे सॉफ्टवेअर आहे Autodesk Fusion 360 व तिसरे सॉफ्टवेअर आहे Solidworks. त्यातले पहिले सॉफ्टवेअर फ्री सॉफ्टवेअर इंटरनेटवर आहे. या सॉफ्टवेअर द्वारे तुम्ही बनवलेला पार्ट तुम्हाला शेवटी कसा दिसणार आहे तसा दिसतो . ह्या पायरी दरम्यान तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर तो तुम्ही येथेच करू शकता व तुमच्या आवडीनुसार किंवा हव्या असलेल्या आकाराप्रमाणे त्यात बदल करू शकता.
पायरी क्रमांक 2 - STL FILE (STEREOLITHOGRAPHY - STANDARD TRIANGLE LANGUAGE)
3D Model कॉम्प्युटरवर बनवल्यावर त्यातून तुम्ही STL File सेव्ह करून घेऊ शकता. या फाईल मध्ये फक्त त्या मॉडेलचा आकार धरला जातो, त्याचा रंग कोणता असणार त्याचं Texture (वीण) कसं असणार हे धरलं जात नाही. ही फाईल AutoCAD Softwareवर आपोआप बनते आणि ती STL File नंतर Slicing Software ला पाठवली जाते.
पायरी क्रमांक 3 - Slicing Software
3D मॉडेल वरून परस्पर 3D प्रिंटर वर पाठवू शकत नाही तर पार्ट किंवा मॉडेल तयार करण्यासाठी त्यात 3D मॉडेल्स Slicing सॉफ्टवेअरवर थरावर थर करून ती फाईल नंतर पुढच्या प्रक्रियेसाठी पाठविली जाते. वरील चित्रात थराची कल्पना येण्यासाठी दाखविले आहे. प्रचलित असे तीन Slicing Software आहेत जसे की Makerware, CURA आणि Simplify 3D. यातील CURA हे फ्री सॉफ्टवेअर इंटरनेटवर आहे.
पायरी क्रमांक 4 - Layer Slices and Tool Path
नंतर या Slicing Software मध्ये तुम्ही किती mm चा थर चढवणार आहात, तापमान किती ठेवणार, रंग
कोणता वापरणार व किती जलद पार्ट बनवायचे हे ठरविले जाते.
म्हणजे प्रिंटर काय काय करणार पार्ट बनवताना हे ठरविले जाते. या येथे पार्ट बनवताना कसा करायचा कोठून
सुरुवात करायची हे ठरवले जाते, कारण ते बनवतानातो पडला
नाही पाहिजे त्याप्रमाणे त्याला हवा असलेला सपोर्टचा
विचार केला जातो. हे सगळे G-Code मध्ये बनवले
जाते. G -Code ही भाषा प्रिंटरला कळते त्याद्वारे ते पार्ट
बनवते.
पायरी
क्रमांक 5 - 3D Printer
मग ही G_Code फाईल पेन ड्राइव मध्ये घेऊन प्रिंटर ला जोडल्यावर प्रिंटर त्याप्रमाणे काम करून पार्ट तयार करतो. सर्वात प्रचलित 3d प्रिंटर Ultimaker आणि Makerbotचा आहे. आपल्याला जो हवा असलेला रंगाची वायर जोडली जाते व व प्रिंटर चालू केल्यावर थरावर थर चढवून आपल्याला हवा असलेला पार्ट किंवा मॉडेल बनवले जाते. जरी थरावर थर चढत असलेले तरी ते एकमेकांना घट्ट धरून राहतात व कालांतराने एकरूप होतात. वायरच्या टोकावर हिट दिल्यामुळे ती वितळत जाते आणि आणि हवा असलेल्या आकाराप्रमाणे वितळते आणि पार्ट तयार होतो हळूहळू एक थर झाल्यावर ज्या टेबलावर तो पार्ट तयार होत असतो तो खाली खाली जातो व त्याप्रमाणे थरावर थर वरती चढत जातात आणि शेवटी तुम्हाला हवा असलेला पार्ट तयार होतो.
पायरी
क्रमांक 6 - 3D Object
मग 3D Object किंवा Part तयार होतो. केलेल्या पार्टला फिनिशिंग करावं लागतं, त्याला सपोर्ट करण्यासाठी ठेवलेले सपोर्ट काढले जातात व हवा असल्यास पॉलिश पेपरने घासून गुळगुळीत केला जातो. हल्लीचे 3D प्रिंटर अगदी अध्यावत असल्याकारणाने जास्त फिनिशिंग करावं लागत नाही.\
ही सगळी 3D प्रिंटींग प्रोसेस थोडक्यात समजून घेतल्यावर चला तर आपण बघू या एका व्हिडिओद्वारे 3D प्रिंटर वर पार्ट कसा बनवला जातो जेणेकरून तुम्हाला अधिक रित्या समजेल.
https://www.youtube.com/watch?v=FqQAjkZOBeY&t=8s
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर खाली comment करा व share करा. आणि जर तुम्ही ८वी ते Graduation चे विद्यार्थी किंव्हा अश्या विद्यार्थ्यात्याचे पालक असाल तर हा Facebook Private Group "Mission 3D for Generation Next" जॉईन करा
https://www.facebook.com/groups/591306978203135/

















